अवघ्या ४० रुपयांसाठी चाकूहल्ला प्रकरणाचा ४२ वर्षांनी लागला निकाल; पुराव्याअभावी आरोपी निर्दोष

नागपूर (उपसंपादक उमेश अबलनकर) : चाकू भोसकून ४० रुपये लुटण्याचे एक प्रकरण न्यायालयात तब्बल ४२ वर्षे लांबले. या दरम्यान, या प्रकरणातील चारपैकी तीन आरोपी व सातपैकी चार सरकारी साक्षीदारांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणाचा निकाल लागला असून, ठोस पुरावे नसल्यामुळे आरोपीला निर्दोष सोडण्यात आले आहे.

भीमराव राजाराम नितनवरे (वय ६५) आतापर्यंत जामिनावर बाहेर होता. इतर आरोपींमध्ये रमेश मेश्राम, मधुकर पाटील व हिरामण ढोके यांचा समावेश होता. ही घटना १३ जानेवारी १९७८ रोजी हिंगणा रोडवर घडली होती. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी सर्वप्रथम आरोपी रमेश मेश्रामला अटक करण्यात यश मिळविले, पण इतर आरोपी फरार होते. दरम्यान, पोलिसांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. काही वर्षांनंतर फरार आरोपी मधुकर पाटील व हिरामण ढोकेचा मृत्यू झाल्याचे कळले.

पुढे भीमराव नितनवरे पोलिसांना सापडला. त्यानंतर आरोपी रमेश मरण पावला. अशा विविध कारणांनी हे प्रकरण लांबत गेले. दरम्यान, प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने नितनवरेविरुद्ध खटला चालविण्यासाठी हे प्रकरण सत्र न्यायालयाकडे वर्ग केले होते. सत्र न्यायालयाने अडीच वर्षांमध्ये हा खटला निकाली काढला. आरोपीच्या वतीने अॅड. अमित बंड यांनी कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here