विवाहितेवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या पतीला अटक

जळगाव (क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : जिल्ह्यातील यावल शहरात २३ वर्षीय विवाहितेवर पतीकडून अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी पतीविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पतीस अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

लग्नाच्या आठ दिवसानंतर पतीला दारूचे व्यसन जडले. दारूच्या नशेत घरी येवून पत्नीशी अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला. त्यांचे लव्हमॅरेज असल्याने लग्नात हुंडा मिळाला नाही म्हणून आता दिवाळीसाठी माहेरहून कार, रोख रक्कम व सोन्याची अंगठी आणावी यासाठी विवाहितेचा छळ केला.

अत्याचार सहन न झाल्याने त्यांनी यावल पोलीस ठाणे गाठलत पतीविरोधात गुन्हा दखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक अजमल खान पठाण, पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here