पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : धानोरी परिसरातील एका व्यक्तीची नोकरी मिळवून देण्याचे आमिषाने तब्बल चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी ४४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एप्रिल २०१७ ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला आहे.
तक्रारदार यांना नोकरीची आवशकता होती. त्यामुळे त्यांनी ऑनलाईन माहिती घेतली होती. यादरम्यान, आरोपीने त्यांना सिजेंन्टा या कंपनीत नोकरी लावून देतो असे म्हणून त्यांच्याकडून ७ लाख रुपये उकळले. परंतु, नोकरी लावली नाही. त्यांनी पैसे परत मागितले असता त्यांना ३ लाख ३३ हजार रुपये दिले. परंतु, उर्वरित रक्कम परत न देता त्यांची फसवणूक केली आहे.






