पंच ‘आलिम दर’ दोन वेळा बचावले, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

दुबई :– टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेतील दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडीज यांच्यातील सामन्यात पंच म्हणून काम केलेले आलिम दर दोन वेळा बचावले. दोन वेळा त्यांना चेंडू लागला असता व गंभीर दुखापत झाली असती. मात्र, त्यांनी अफलातून चपळाई दाखवत स्वतःचा बचाव केला.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दर यांनी ज्या पद्धतीने चपळता दाखवत स्वत:चा जीव वाचवला, त्याबद्दल नेटकरी खूप प्रशंसा करत आहेत.
वेस्ट इंडीजच्या डावातील अखेरच्या 20 व्या षटकात ही घटना घडली.

 

 

यावेळी कॅरन पोलार्डने प्रिटोरियसच्या गोलंदाजीवर स्ट्रेट ड्राइव्हचा फटका मारला. तो चेंडू पंच दर यांच्या दिशेने अत्यंत वेगाने आला. मात्र, त्यांनी तातडीने बाजूला सरकत स्वतःचा बचाव केला. मात्र, या प्रयत्नात ते खाली पडले.

पोलार्डने मारलेला फटका सीमारेषेवर रासी वान डेर दुसान याने अडवला आणि थ्रो केला. यावेळीदेखील हा थ्रो दर यांना लागला असता; पण त्यांनी पुन्हा एकदा चेंडूपासून स्वतःचा बचाव केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here