शेतातील वादातून सख्ख्या भावाने केला भावाच्या खुनाचा प्रयत्न

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : उरळगाव ता. शिरुर येथे शेतातील सामायिक विहिरीवरील पाणी घेण्यावरुन झालेल्या वादातून सख्ख्या भावाने आपल्या भावावर कोयत्याने वार करत भावाचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. शिरुर पोलिसांनी विनायक परशुराम सात्रस याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

उरळगाव ता. शिरुर येथील अनिल सात्रस व परशुराम सात्रस हे दोघे सख्खे भाऊ, त्यांच्या शेतातील विहिर सामाईक असून, दोघेही त्या विहिरीवरील पाणी शेतासाठी वापरत असतात. त्या शेतातील विहिरीच्या पाण्यावरुन अनिलच्या कुटुंबियांसोबत विनायक यांचा सहा महिन्यांपूर्वी वाद होऊन भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरुन विनायक याने लोखंडी कोयता घेत आपला सख्खा भाऊ अनिल याच्यावर जीवे मार मारण्याच्या हेतूने हल्ला केला. यामध्ये अनिल याच्या हाताची करंगळी तुटली असून, अनिलच्या डोक्यात देखील गंभीर दुखापत झाली आहे.

याबाबत अनिल परशुराम सात्रस (वय ४५, वर्षे रा. उरळगाव ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिरुर पोलिसांनी विनायक परशुराम सात्रस (वय ४५ वर्षे रा. उरळगाव ता. शिरुर जि. पुणे) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे हे करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here