जळगाव (क्राइम रिपोर्टर असलम खान) : सुप्रीम कॉलनीतील नितीन साहित्य नगरातील रिक्षाचालक यांना सापडलेल्या खोक्यातील काही वस्तूंचे वाटप सुरु असल्याची माहिती खबऱ्यांनी पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी हा खोका पंचनामा करत जप्त केला.
या खोक्याची तपासणी केली असता त्यात मोबाईल व इमिटेशन ज्वेलरी असल्याचे आढळले. या वस्तूंवरून मूळ मालकांचा शोध घेतला असता, ९ मोबाइल हे दीपक कुमार कुकरेजा (वय ४०) राहणार सिंधी कॉलोनी जळगाव आणि इमिटेशन ज्वेलरी विजय तिलोकचंद बजाज (वय ३६) टीएम नगर जळगाव यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले.
या दोघा व्यापाऱ्यांनी हा खोका जालना येथे पाठवण्यासाठी राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या गुनीना कमर्शियल प्रा.लि. मार्फत बुक केला होता. या मुद्देमालबाबत त्यांनी बिल सादर केले. त्यामुळे तो मुद्देमाल दोघा व्यापा-यांनी परत करण्यात आला. १ लाख ६५ हजार रुपये किमतीची इमिटेशन ज्वेलरी विजय बजाज यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाल्यवर त्यांना परत देण्यात आली आहे.
याप्रकरणी पो. नि प्रताप शिकारे, व त्यांची सहकारी सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.नाइक हेमंत कळसकर, सुधीर साळवे, चंद्रकांत पाटील, सतीश गरजे, सचिन पाटील, आदींनी या तपासकामात सहभाग घेत.






