शिर्डी (प्रतिनिधी) : संगमनेर येथे भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील आणि खासदार सुजय दादा विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील संगमनेर मध्ये होत असलेल्या राष्ट्रीय वयोश्री तपासणी शिबीराच्या जाहिरात रथाचे उदघाटन भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून करण्यात आले यावेळी भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.






