पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : लग्नाचे अमिष दाखवत १९ वर्षीय तरुणाने १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. यातून ही अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर बलात्काराचे हे प्रकरण उघडकीस आले आहे. हा प्रकार जून ते २९ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत एमआयडीसी भोसरी परिसरात घडला.
याबाबत पीडित मुलीच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी या प्रकरणी कैलास शहाजी पाटोळे (वय १९, रा. एमआयडीसी भोसरी) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या १५ वर्षीय मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधली. आरोपीने त्याच्या दुचाकीवरून पीडित मुलीला त्याच्या घरी आणि एच ए कॉलनीच्या पाठीमागील गेटजवळ खोलीत नेऊन तिच्यावर वेळोवेळी जबरदस्तीने बलात्कार केला. पीडित मुलगी यामुळे गरोदर राहिली. हा प्रकार कुटुंबियांच्या निदर्शनास येताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.






