जन्मदात्यानेच केला १३ वर्षीय मुलीवर केला बलात्कार

हमीरपूर (हिमाचल प्रदेश) : जिल्ह्यातील एका गावात भाड्याच्या घरामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्याच १३ वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. या घटनेनंतर तो फरार झाला आहे. परिसरात यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार, मुलीसोबत घडलेल्या या प्रकारानंतर ती खूप घाबरली होती. तिने आपल्या आईला या भयंकर प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर आईनेच हमीरपूर येथे जाऊन पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा वैद्यकीय तपासणी केली असता त्यामध्ये देखील बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते फरार आरोपीचा शोध घेत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मुलीने रडत रडत वडिलांनी तिच्यासोबतच केलेल्या दुष्कृत्याची आईला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. आरोपीला लवकरात लवकर पकडा असं देखील महिलेने म्हटलं आहे. हमीरपूरच्या एसपी आकृती शर्मा यांनी महिलेने मुलीसोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला आहे. पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक कसून तपास करण्यात येत आहे. आरोपीला लवकरच पकडण्यात येईल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here