तहसीलदार नितीन कुमार देवरे यांना दिले निवेदन
धरणगाव (प्रतिनिधी भाईदास पाटील) : भवरखेडे येथील रेशन दुकान क्र, ५७ ,आर,डी,पाटील,स्वस्त धान्य दुकान हे गेल्या तीन महिन्यापासून निलंबित करण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध ग्रामस्थांनी वारंवार ग्रामपंचायत कडे तक्रारी केल्या होत्या ,लाभार्थी ना व्यवस्थितपणे रेशन वाटप न करणे,रेशन कार्ड अदलाबदल करुन खाडाखोड करणे , परस्पर युनिट कमी जास्त करणे,लाभार्थीना वेठीस धरुन उडवाउडवीची उत्तरे देणे अशा अनेक प्रकारच्या तक्रारी ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामपंचायतीकडे मांडल्या आहेत.
आता हे रेशन दुकान बिलखेडा येथील दुकान क्र, ३८ यांच्या कडे तात्पुरते स्वरूपात चालविण्यासाठी देण्यात आले आहे व ते आर,डी,पाटील पेक्षा ही आता रेशन वाटप व्यवस्थितरित्या व नियमितपणे वाटप होत असल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे, ते रेशन दुकान आर,डी,पाटील यांच्या कडून बंद करून कायमस्वरूपी परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी येथील सरपंच किरण पाटील,उपसरपंच अजय ब्राम्हणे,ग्रा,पं,सदस्य उगलाल पाटील,विजय सुर्यवंशी,प्रशांत प्रकाश पाटील, विवरे येथील ग्रा,प, सदस्य दिलीप पाटील,पिंटू पाटील ,ग्रामस्थ,मुन्ना महाजन, गिरीश पाटील,विकास माळी,गोकुळ महाजन,तसेच विकास सोसायटी चे चेअरमन, प्रमोद शिवाजी पाटील व्हा,चेअरमन,सदस्य,गावातील महिला बचत गटाच्या सर्व महीला मंडळ व लाभार्थ्यांच्या सहया करून निवेदन तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्याकडे दिले आहे.
तहसीलदार यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करुन परवाना रद्द करून ते दुकान इतर कोणाकडे ही किंवा तात्पुरते स्वरूपात ज्यांचा कडे दिले आहे त्यांच्याकडेच राहु द्यावे,अशी मागणी सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ कडून होत आहे.






