कर्नाटकात कुटुंबातील ५ जणांची सामूहिक आत्महत्या

हुक्केरी (कर्नाटक) : तालुक्यातील एका गावात ब्लॅक फंगसमुळे पत्नीच्या मृत्यूमुळे धक्का बसलेल्या एका सेवा निवृत्त सैनिक आणि त्याच्या पाच मुलांनी आत्महत्या केली.

पोलिसांनी सांगितलं की,गोपाळ हदिमानी (४६) आणि त्यांची चार मुलं सौम्या (१९), श्वेता (१६), साक्षी (११) आणि सृजन हदिमानी (८) यांनी शुक्रवारी रात्री विष घेऊन आत्महत्या केली. शेजारच्यांना सकाळी घरातील एकही सदस्य दिसला नाही, म्हणून त्यांना शंका आली आणि त्यांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली.

पत्नीच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्याच्यावर मोठा आघात झाला होता. यासंबंधित एका व्यक्तीने सांगितलं की, तो आणि त्याची मुलं वारंवार आईची आठवण काढत आणि तिच्याशिवाय जगू शकणार नसल्याचं म्हणत असतं. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here