पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : पुण्यातील एका शिक्षकाने अल्पवयीन मुलीला टेरेसवर नेऊन तिच्यावर बलात्कार करुन अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी ५२ वर्षाच्या शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला काळीमा फासणारा हा प३कार वानवडी परिसरात घडला आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ३ ऑगस्ट आणि २९ ऑक्टोबर दरम्यान आरोपीच्या राहत्या घराच्या टेरेसवर घडला. पीडित मुलीला धमकावून त्याने हे कृत्य केले. पीडित मुलीने तिच्या आईला आरोपीने केलेल्या घाणेरड्या कृत्याबद्दल सांगितल्यावर आईने वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
याप्रकरणी वानवडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पीडित मुलीच्या (वय-१५) आईच्या फिर्यादीवरून संजय रमेश शर्मा (वय-५२ रा. जगताप नगर, वानवडी) याला अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी दिली.






