पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : सफाईकाम करत असलेल्या महिलेसोबत गैरवर्तन करून एकाने विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. ३१) दुपारी खेड येथे घडली. याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार ज्ञानेश्वर रामजी चौधरी (रा.लांडगेनगर, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सफाईचे काम करते. ती तिच्या कामाच्या ठिकाणी सफाईचे काम करत असताना आरोपी तिथे आला. त्याने महिलेसोबत गैरवर्तन केले.
पीडित महिलेने त्यास विरोध केला असता आरोपीने महिलेला मारहाण व दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.






