पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या कोल्हेवाडी खडकवासला येथील वर्दळीच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली असून तरुणाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. आशिष प्रताप कोल्हे (रा. कोल्हेवाडी, खडकवासला) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम व इतर पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव विजय उर्फ पांडा राऊत (रा.कोल्हेवाडी, खडकवासला) असल्याचे सांगितले असून हल्ला केल्यानंतर तो फरार झाला आहे. हल्ला करणारा व्यक्ती जखमी तरुणाच्या ओळखीचा नसल्याने हल्ल्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. याबाबत हवेली पोलीस अधिक तपास करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी तरुणाशीही संवाद साधला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हल्लेखोराचे नाव समजले असून तो सध्या फरार झाला असल्याची माहिती मिळत आहे. पुढील तपास हवेली पोलीस करीत आहेत.






