मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे समीर वानखेडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नबाव मलिकांचं गौप्यस्फोटाचं सत्र आतादेखील सुरू असल्याचं दिसून येतंय.
दरम्यान अशातच आता नवाब मलिक यांनी शेअर केलेल्या नव्या ट्विटमुळे समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये एक व्यक्ती जीममध्ये सेल्फी घेताना दिसत आहे. त्यावर ही व्यक्ती कोण आहे?, असा सवाल मलिकांनी शेअर केला आहे.
Who is this person ?
What is his relation with Dawood Wankhede and Sameer Dawood Wankhede ?
Please let us know pic.twitter.com/jGBUmLCjPK— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 30, 2021
त्याचा दाऊद वानखेडे आणि समीर दाऊद वानखेडे यांच्याशी काय संबंध?, असा सवाल देखील नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.







