पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) : ग्वाल्हेरमध्ये १९ वर्षीय तरुणी बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणी मूळ उत्तर प्रदेशातील झाशीची रहिवासी असून ती मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे राहून पोलीस भरती परीक्षेची तयारी करत होती. यावेळी एका फेसबुक फ्रेंडने नोकरीसाठी मुलाखत देण्याच्या बहाण्याने ग्वाल्हेरला बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार पीडित तरुण आणि आरोपी तरुण या दोघांची फेसबुकवर २ महिन्यांपूर्वी मैत्री झाली होती. तरुणीच्या दाव्यानुसार आरोपीने तिला नोकरीच्या मुलाखतीच्या बहाण्याने ग्वाल्हेरला बोलावले. ती ग्वाल्हेरला आल्यावर मुलाने तिला बहोदापूर येथील भाड्याच्या खोलीत नेले आणि झोपेच्या गोळ्या मिसळलेले शीतपेय दिले. ती बेशुद्ध झाल्यावर तरुणाने तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा व्हिडीओ शूट केला.

बलात्कारानंतर आरोपीने विद्यार्थिनीची कागदपत्रेही स्वतःजवळ ठेवली. रविवारी आरोपीने तिला कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने पुन्हा बोलावले आणि तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. परंतु कागदपत्रे परत केली नाहीत. विद्यार्थिनीला डीआरपी लाईनच्या बाहेर सोडले. अखेर तिने बहोरापूर पोलीस ठाणे गाठून एफआयआर दाखल केला.

विद्यार्थिनीच्या तक्रारीत म्हटले आहे की, रविवारी आरोपीने तिला कागदपत्रं देण्याच्या बहाण्याने पुन्हा बोलावले. त्याने तिला पुन्हा तिच्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर तरुणीला डीआरपी लाइनच्या गेटवर सोडून पळून गेला. दोन वेळा अत्याचार केल्यानंतरही तरुणाने तिची कागदपत्रे परत केली नाहीत. बहोदापूर पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली आहे. आरोपी आवेशला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक श्योपूरला रवाना झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here