मध्यप्रदेशातील हेड कॉन्स्टेबलच्या घरावर, फार्म हाऊसवर धाडीत १४ गाड्यांसह चार कोटींची मालमत्ता जप्त

जबलपूर (मध्यप्रदेश) : बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी जबलपूर लोकायुक्तांनी मोठी कारवाई केली असून, मध्यप्रदेश पोलिसात कार्यरत हेड कॉन्स्टेबल सच्चिदानंद सिंह यांच्या घरावर आणि फार्म हाऊसवर लोकायुक्तांनी छापा टाकला, त्यावेळी संपत्ती पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला.

दरम्यान, या कारवाईवेळी पथकाने कोट्यवधींची मालमत्ता आणि अनेक वाहने जप्त केली आहेत. हेड कॉन्स्टेबल सच्चिदानंद सिंह सध्या तिलवारघाट पोलिस स्टेशनमध्ये तैनात आहेत. करोडपती हेड कॉन्स्टेबलवर झालेल्या या कारवाईने विभागात खळबळ उडाली आहे. मंगळवारी केलेल्या या कारवाईत लोकायुक्त पथकाने ४.३९ कोटी रुपयांची मालमत्ता आणि १४ वाहने जप्त केली आहेत.

पोलीस उपअधीक्षक (लोकायुक्त) जेपी वर्मा म्हणाले, “छापा मारताना आमच्या पथकाला ४.३९कोटी रुपयांची मालमत्ता, फार्म हाऊस, वाहने, शेतजमीन, दागिने, १४ वाहने आणि इतर जीवनावश्यक वस्तू सापडल्या आहेत.” आता याप्रकरणी पुढील कारवाई केली जाईल, असे जेपी वर्मा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here