खंडाळा गाव शिवारात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा; ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका कुंटणखान्यावर छापा टाकण्यात आला असून ५ जणांविरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि खंडाळा गावच्या शिवारात अक्षय कर्डिले याच्या सुरू असलेल्या कुंटणखान्यावर नगर तालुका पोलिसांनी छापा टाकला. अक्षय कर्डिले याच्या मालकीचे हॉटेल राजयोग आहे, त्याठिकाणी आरोपी कुंटणखाना चालवत होते. मंगळवार (दि. २) सायंकाळी सातच्या दरम्यान नगर तालुका पोलिसांनी खंडाळा गावच्या शिवारातील हॉटेल राजयोग येथे छापा टाकला आहे.

आरोपी हॉटेल राजयोगमध्ये संगनमताने स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता महिला व मुलींना देह विक्री करण्यासाठी बोलवून घेत. त्या महिला व मुलींकडून गैरमार्गाने देहविक्री करून कुंटणखाना चालवत होते. पोलिसांनी देहविक्री करणार्‍या दोन मुलींना ताब्यात घेतले आहे व पाचही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जारवाल करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here