पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : पत्नी मोबाईल बघते म्हणून पतीने भाजी कापण्याच्या चाकूने तिच्यावर वार केले. यात पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी (दि. २) सायंकाळी चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे घडली.
दिलीप बाबुराव मोरे (वय ४५, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अक्षय दिलीप मोरे (वय २१) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिलीप हा फिर्यादी यांचा पिता आहे. फिर्यादी यांची आई मंगळवारी सायंकाळी मोबाईल बघत होती. त्याचा आरोपीला राग आला. त्याने घरातील भाजी कापण्याच्या चाकूने फिर्यादी यांच्या आईच्या मांडीवर, पायावर, हातावर, छातीवर वार करून गंभीर जखमी केले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.






