पुण्यात उच्चभ्रू सोसायटीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन जण अटकेत

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : येथील बिबेवाडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत सुरू असणाऱ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. पोलिसांनी त्या ठिकाणाहून दोन पीडित तरुणींची सुटका केली असून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या महिंद्र ज्ञाना राम प्रजापती (वय ३४) आणि पांडुरंग लक्ष्‍मण शिंदे (वय ४६) या दोघांना अटक केली असून, त्यांच्याविरोधात बिबेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, बिबेवाडी पोलीस ठाण्यातील पोलिसांना रासकर पॅलेस या उच्चभ्रू सोसायटीत वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या माहितीची खातरजमा केली. माहिती खरी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने या ठिकाणी छापा टाकला.

त्याठिकाणाहून पोलिसांनी रोख ४ हजार रुपये, तीन मोबाईल, कंडोमची पाकिटे आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. पीडित तरुणीला संरक्षणासाठी हडपसर येथील रेस्क्यू फाउंडेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here