दुकानमालक ओरडल्याचा राग आल्याने केली हातोड्याने मारहाण

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : फटाके रस्त्यावर लावून तो पायाने ढकल्याने दुकान मालकाच्या पायाजवळ जाऊन फुटला़ त्यामुळे मालक ओरडल्याने त्याचा राग धरुन टोळक्याने हातोडा, दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले़ तसेच इतर कामगारांना शिवीगाळ करुन दहशत माजविण्याचा प्रकार विश्रांतवाडीतील टिंगरेनगर रोडवर गुरुवारी रात्री ९ वाजता घडला.

शिवाजी पाटील (रा़ टिंगरेनगर) हे प्रकारात गंभीर जखमी झाले आहेत़ उस्मान अब्दुल खान (वय ४३, रा़ येरवडा) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्यावरुन निहाल सुनिल सरोदे (वय २६), विनोद राजू जमखंडे ऊर्फ गोट्या (वय २२), अमोल तात्या चव्हाण (वय २४, सर्व रा. श्रमिक वसाहत, टिंगरेनगर) या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी निकेश साळवे (वय २३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

निलेश साळवे याने रस्त्यावर फटाके लावून तो पायाने शिवाजी पाटील यांच्याकडे ढकलला. तो फटाका पाटील यांच्या पायाजवळ जाऊन फुटला. त्यामुळे पाटील हे ओरडले. त्याचा राग मनात धरुन चौघांनी लोखंडी हातोड्याने व दगडाने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. इतर कामगारांना शिवीगाळ करुन धमकी देऊन दहशत माजविली. विश्रांतवाडी पोलिसांनी चौघांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शेख तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here