जळगाव (संपादक सुनिल पाटील) – आज दि 9-ऑगस्ट-2020, रविवार रोजी सकाळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता कॅबिनेट मंत्री श्री गुलाबराव पाटिल यांच्या निवासस्थानी त्यांच्या स्वहस्ते श्रीमती शितलताई जडे यांनी लाॅकडाऊन सारख्या कठीण काळात लहान ते मोठ्या विद्यार्थ्यांना शिकता यावे म्हणून लिहिलेल्या “Fun with English Grammar” या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. त्या प्रसंगी तिथे रायसोनी इन्स्टिट्यूट चे प्रा रफिक शेख, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, पोलिस बाॅईस संघटनेचे अध्यक्ष भावेश ठाकुर आदि उपस्थित होते.








