पुण्यात लष्करी अधिकाऱ्याच्या घरात चोरी, दारूच्या १५ बाटल्या पळवल्या

thief

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : येथील खडकी परिसरात राहणाऱ्या एका लष्करी अधिकाऱ्याच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि दारूच्या बाटल्या आणि चांदीची भांडी चोरून नेली आहेत.

याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एका ४५ वर्षीय लष्करी अधिकाऱ्याने या प्रकरणी तक्रार दिली आहे. ३ ते ११ नोव्हेंबर या काळात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भारतीय लष्करात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत आहेत. खडकी परिसरात ते राहण्यासाठी आहे. दिवाळीनिमित्त घराला कुलूप लावून ते गावाकडे गेले होते. दरम्यान घरात कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला.

तसेच, त्यांच्या घरातील चांदीची भांडी व दारूच्या १५ बाटल्या असा ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ते परत आल्यानंतर त्यांना घरफोडीचा प्रकार दिसून आला. त्यानंतर त्यांनी पोलीसांकडे तक्रार केली. अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here