बदनामी करण्याची धमकी देत विवाहितेकडे शरीरसुखाची मागणी

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : येथील हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ३० वर्षीय विवाहितेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून माझ्यासोबत प्रेमसंबंध नाही ठेवली तर तुझ्या नवऱ्याला सांगून बदनाम करेल अशी धमकी देऊन विवाहितेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या अंकुश वाघमारे या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विवाहितेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घरात एकट्या असल्याचे पाहून आरोपी चार नोव्हेंबर रोजी जबरदस्तीने घरात शिरला. त्यानंतर त्याने फिर्यादीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने याला विरोध केला असता तू जर माझ्यावर प्रेम नाही केले तर आपल्या प्रेम संबंधाबाबत तुझ्या नवऱ्याला व नातेवाईकांना सांगून बदनामी करेल अशी धमकी दिली.

त्यानंतर आणखी चार दिवसांनी आरोपी फिर्यादी महिलेच्या घराजवळ आला आणि त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर फिर्यादीने हा सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here