सोलापूर येथे ड्रममध्ये आढळला नवजात बालकाचा मृतदेह

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) : मुरारजी पेठेतील मंगळवेढेकर चाळीत घरासमोरील पाण्याच्या ड्रममध्ये नवजात बालकाचा मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, संकेत सुरवसे यांच्या पत्नीने २५ दिवसांपूर्वी एका मुलाला जन्म दिला होता. रात्री संकेत कामानिमित्त बाहेर गेले होते. घरी वृद्ध आई, पत्नी, तसेच दोन लहान मुले होती. नवजात बालक आईजवळ झोपले होते. पहाटे संकेत कामावरून घरी आल्यानंतर मुलगा पाळण्यात व आईजवळही दिसला नाही. त्याने पत्नीसह शोधाशोध सुरू केला. शोध सुरू असताना घरासमोर ठेवलेल्या पाण्याच्या ड्रममध्ये मुलगा मृतावस्थेत तरंगताना आढळला.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन नवजात बालकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे. पोलिसांनी संकेत, त्याची पत्नी, आई या सर्वांची चौकशी सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here