महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवणाऱ्या जुलमी कर्नाटक सरकारचा धरणगाव शिवसेना तर्फे जाहीर निषेध

धरणगांव (योगेश पी पाटील) – कर्नाटक मधील बेळगाव जिल्ह्यातील मनगुटी या मराठी भाषिक असलेल्या गावातील छ.शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा एडीयुरप्पा मुख्यमंत्री असलेल्या कर्नाटक सरकार ने मध्यरात्री हटवला.मराठी माणसाच्या व समस्त शिवप्रेमी असलेल्या नागरिकांच्या भावना या सरकारने दुखावल्या आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान यांनी केला आहे.यावरच न थांबता ह्या जुलमी सरकारने शालेय पाठ्यपुस्तकात असलेला महाराजांवरील धडा सुद्धा ह्या सरकारने काढून टाकला आहे.समस्त महाराष्ट्र व समस्त शिवप्रेमी नागरिकांचा हा अपमान आहे.ह्या कर्नाटक सरकारचा निषेध म्हणून काल (दि.९) धरणगाव शिवसेना तर्फे एडीयुरप्पा सरकारचा कर्नाटक सरकारचा पुतळा दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबरावजी वाघ,लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, उप जिल्हा प्रमुख पि.एम.पाटील सर,तालुका प्रमुख गजानन पाटील,प.स.सभापती मुकुंद ननावरे,प.स.माजी सभापती डी.ओ.पाटील,नगरसेवक शहर प्रमुख राजेंद्र महाजन, नगरसेवक पप्पू भावे,विजय महाजन, वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, जितेंद्र न्हाळदे, किरण मराठे,अजय चौहान, बापू पारेराव,सुरेश महाजन,विलास माळी, नन्दकिशोर पाटील,धिरेंद्र पुरभे,बाळू जाधव,सतिष बोरसे,रवी जाधव,राहुल रोकडे,गारखेडा चे जिजाब पाटील,जगण महाजन,बांभोरी चे सुभाश पाटील,कमलेश बोरसे, गोलू चौधरी, किशोर मराठे,सुकलाल चौधरी, अरविंद चौधरी, तोहसीप पटेल,भैया महाजन,नागराज पाटील, गोपाळ पाटील,पवन पाटील,महेंद्र चौधरी, अविनाश चौधरी, छोटुभाऊ चौधरी, हेमंत चौधरी,विकास मोरवरकर,दारासिंग धनगर,वसंत ठाकूर सह गावातील असंख्य शिवसैनिक, व शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here