अहमदनगर (प्रतिनिधी) : नेवासा येथील खडका फाटा रस्त्यावर मार्केट कमिटी जवळील एका खाद्य तेल कंपनी मधून कंपनीच्या मालकाचा मुलगा सायंकाळी पैशाची बॅग घेऊन कंपनी शेजारीच असलेल्या घराच्या गेट जवळ आला असता समोरच काट्यात दबा धरून बसलेले चोरांनी पैशाची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला.
झटापटीत चोरांनी जवळील बंदुकीतून फायर केल्याची घटना घडली असून चोर बॅग घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. सदरील घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मात्र सुदैवाने मुलास कुठलिही इजा झालेली नाही. सदरील घटना कळताच पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी कर्मचाऱ्यांसह पाहणी केली व तत्काळ तपासाच्या दिशेने कर्मचाऱ्यांना सूचना करून परिसरात नाकाबंदीसाठी रवाना केले. यावेळी घटनास्थळी नागरिक व व्यापारी मोठ्या संख्येने जमा झाले होते.






