नगर शहरात तरूणाकडून वृद्ध महिलेला मारहाण करत अत्याचार

अहमदनगर (प्रतिनिधी) : घरात एकट्या असलेल्या वृद्ध महिलेला तरूणाने मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला. नगर शहरामधील एका उपनगरात गुरूवारी मध्यरात्री ही घटना घडली. मारहाणीत वृद्ध महिला जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

पिडीत महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात तरूणाविरोधात अत्याचारा गुन्हा दाखल केला आहे. राजु साहेबराव काते (रा. बारस्कर कॉलनी, लालटाकी, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तोफखाना पोलिसांना त्याला अटक केली आहे. ७४ वर्षीय वृद्ध महिला नगर शहरातील एका उपनगरात एकटी राहते. गुरूवारी रात्री वृद्ध महिला घरामध्ये झोपलेली असताना काते याने तिच्या घरामध्ये अनधिकृतपणे प्रवेश केला. वृद्धेला ढकलून खाली पाडले.

काते याने वृद्धेच्या तोंडावर बुक्क्याने व चापटीने मारहाण केली. ‘तु जर आरडाओरडा केला तर, तुझा या घरातच मुडदा पाडीण’, असे म्हणत काते याने वृद्धेवर अत्याचार केला. ‘तु जर कोणाला काही सांगितले तर, तुला याच घरात जाळून टाकील’, अशी धमकी दिली. तसेच काते याने वृद्धेला काचेच्या बाटलीने डोक्यात मारहाण करून जखमी केले. जखमी वृद्धेला सकाळी स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here