कॉंग्रेसमुळेच देशाची फाळणी; एमआयएम या पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांची टीका

हैद्राबाद (तेलंगना) : देशाच्या फाळणीला कॉंग्रेस आणि या पक्षाचे त्यावेळेचे नेतेच जबाबदार असल्याची टीका एमआयएम या पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी आणि समाजवादी पार्टी यांचे जे लोक इतिहास वाचत नाही, त्यांना आव्हान देतो.फाळणी मुस्लिमांमुळे किंवा जिना यांच्यामुळे झाली नाही. त्यावेळी फक्त तेच मुस्लिम मतदान करू शकत होते जे नवाब किंवा पदवीधारकांसारखे प्रभावशाली होते. कॉंग्रेस आणि त्यावेळचे नेतेच फाळणीसाठी जबाबदार होते असे एका सभेत भाषण करताना त्यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख ओपी राजभर यांनी बुधवारी वाराणसीमध्ये मोहम्मद अली जिना यांना भारताचे पहिले पंतप्रधान केले असते तर देशाची फाळणी झाली नसती, असे वक्तव्य केल्यानंतर ओवेसी यांनी हे वक्तव्य केले आहे. राजभर यांनी या घटनेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरले होते. पण भारतातील मुस्लीमांचा जीनांशी काही संबंध नाही अशा आशयाची टिप्पणी करत ओवेसी यांनी राजभर यांचा दावाही फेटाळून लावला आहे.

दरम्यान, कासगंज घटनेत तरुणाच्या मृत्यूबद्दल उत्तर पोलिसांवर टीका करताना ओवेसी म्हणाले, कासगंजची घटना तुमच्यासमोर आहे. अल्ताफच्या वडिलांना सांगण्यात आले की त्यांच्या मुलाने हुडीच्या तारने अडीच फूट उंच पाण्याच्या नळाला गळफास लावून आत्महत्या केली. परंतु कासगंज पोलिसांनीच त्या युवकाला ठार मारले आहे. युपी पोलिसांना तपास करणे माहित नाही तर खून करणे माहित आहे असा आरोप त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here