अमरावतीत मुस्लिम समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण, दुकानांची आणि दुचाकीची तोडफोड

अमरावती (प्रतिनिधी आसिफ कुरैशी) : त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या कथित घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावती मध्ये मुस्लिम बांधवानी आपली दुकाने बंद ठेवली व घटनेचा निषेध केला होता. निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या १५ ते २० हजार लोकांच्या या मोर्चाला हिंसक वळण लागले.

यावेळी मोर्चा करांनी जयस्थभ चौकातील व शहरातील विविध भागातील २० ते २२ दुकानांची प्रचंड तोडफोड केली तसेच एका दुचाकीचीही तोडफोड केली.

amravati-muslim-morcha

मोर्चा दरम्यान मोर्चेकऱ्यांनी भाजप विरोधात व आरएसएस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान पोलीस व आंदोलक आमने सामने देखील आले होते. तर यात दोन पोलीस कर्मचारी दगडफेक झाल्याने जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या मुस्लिम मोर्चाला पूर्णपणे गालबोट लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here