नंदुरबार येथे पुन्हा घरफोडी,८४ हजाराचा ऐवज लंपास

thief

नंदुरबार (प्रतिनिधी तेजस पाठक) : शहरातील चव्हाण चौकात पुन्हा घरफोडी होऊन ८४ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.तीन दिवसात शहरातील ही पाचवी घरफोडी आहे. या चोरीमुळे आता चोरट्यांनी नंदुरबार पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,नंदुरबार शहरातील चव्हाण चौक परिसरातील सागर सुरेश चौधरी हे बाहेरगावी गेलेले असतांना चोरट्यांनी कडीकोयंडा कापून आत प्रवेश केला. घरातील ३० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, अंगठ्या, ओमपान, कानातील दागिने, चांदीचे दागिने, तीन हजाराची रोकड यासह एकूण ८४ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सागर चौधरी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.गेल्या तीन दिवसात नंदुरबार शहरातील ही पाचवी घरफोडी आहे.यातील तीन घरफोड्या तर भरदिवसा झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here