कारंजा पोलीस स्टेशनतर्फे शांततेचे आवाहन

कारंजा (तालुका प्रतिनिधी हफीज खान) : कारंजा पोलीस स्टेशनतर्फे शांततेचे आवाहन करण्यात आले अप्पर पोलीस अधीक्षक वाशिम एस भामरे यांनी हे आवाहन केले आहे. शहरात वातावरण तणावाचे असल्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे.

त्रिपुरा घटनेचे पडसाद कारंजा शहर उमटले असून सामाजिक शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने शांततेचे आवाहन करण्यात आले लोकसमूह गट समूहाने एकत्र येणे टाळावे गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी व सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी प्रयत्न करावे आणि नागरिकांनी समान जास्त वेळ सामंजस्याची व समन्वयाची भूमिका घ्यावी शांतता कायम ठेवावी आणि सामाजिक एकता एकोपा आणि शांतता कायम रहावी यासाठी प्रयत्न करावेत कुठेही अनुचित प्रकार हिंसा तेढ निर्माण होत असल्यास पोलीस प्रशासनाला तत्काळ माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले.

karanja-police

यावेळी फ्लॅग मार्च काढून केले आणि कारंजा पोलीस स्टेशन या ठिकाणी उपस्थित अप्पर पोलीस अधीक्षक वाशिम श्री एस भामरे साहेब कारंजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री आधारसिंग जी सोनवणे साहेब असे मत यावेळी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here