पुण्यात रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वारास लुटले

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : बहिणीला भेटून दुचाकीवरून घरी निघालेल्या तरुणाला रस्त्यात अडवून एका टोळक्याने कोयत्याने मारहाण करत लुटले. हा प्रकार शनिवारी (दि. १३) रात्री साडेअकरा वाजता ओटास्कीम निगडी येथे घडला.

याप्रकरणी मुकुंद अशोक भंडारी (वय २८, रा. हडपसर, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धुनगाव, भाव्या बाविसकर (दोघे रा. ओटास्कीम, निगडी) आणि त्यांच्या साथीदारांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या बहिणीला भेटून परत हडपसर येथे दुचाकीवरून घरी जात होते. ते ओटास्किम येथे चिकन चौकाजवळ आले असता आरोपींनी फिर्यादी यांना अडवले. फिर्यादी यांना शिवीगाळ व दमदाटी करून पैशांची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता धुनगाव याने कोयत्याने मारहाण करून फिर्यादी यांना जखमी केले. अन्य आरोपींनी देखील शिवीगाळ करून मारहाण केली. भाव्या याने दगडाने मारून फिर्यादी यांच्या खिशातून जबरदस्तीने २३ हजार ७४० रुपये काढून घेतले. याप्रकरणी निगडी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here