ठाण्यात ५ वर्षीय मुलीवर बलात्कार; आरोपीचा शोध सुरु

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : येथील रामनगर परिसरात एका ५ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी २० वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पॉक्सो कायदा आणि भादंवि कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका ५ वर्षीय मुलीवर २० वर्षीय कामगाराने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. रविवारी मुलगी रामनगर येथील घराजवळ खेळत असताना आरोपीने तिला आपल्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

या प्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे. शांतीनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here