हनी ट्रॅपला कंटाळून सुसाईड नोटमध्ये मोबाईल पासवर्ड लिहीत ३२ वर्षीय युवकाची आत्महत्या?

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : जिल्ह्यातील इचलकरंजी येथील एका ३२ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.संबंधित युवकाने आत्महत्या करण्याआधी एका चिठ्ठीवर आपल्या मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवला आहे.

इचलकरंजी येथील सुतार मळा परिसरात ही घटना घडली. नेमकं आत्महत्येचं कारण काय? याबाबत मोबाईल पासवर्डच्या सहाय्याने पोलिसांचा तपास सुरु आहे. हनी ट्रॅपला कंटाळून युवकाने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांनी वर्तवला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, संबंधित युवक मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. त्याचं आपल्या कुटुंबाशी आणि मित्रांशी बोलणं कमी झालं होतं.तसेच त्याच्या वागण्यातही फरक पडला होता. यातूनच त्यानं सोमवारी (दि. १५) दुपारी आपल्या राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर कुटुंबीयांना देखील धक्का बसला आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.यावेळी पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून यामध्ये मृत युवकाने आपल्या मोबाइलचा पासवर्ड लिहून ठेवला आहे.संबंधित युवकाने हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर बदनामी होण्याच्या भीतीनं हे पाऊल उचललं असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here