ओटीपी मागून तरुणीला सायबर चोरांनी घातला एक लाख ८१ हजाराला गंडा

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : कधी ऑनलाईन खरेदीच्या माध्यमातून तर कधी लॉटरी लागल्याचे , परदेशातून गिफ्ट पाठवत असल्याचे सांगता सायबर चोरटे लोकांना गंडा घालत आहेत .

सायबर फसवणुकीबाबत पोलीस प्रशासनानं सातत्याने नागरिकांना जागरूक करण्याचे कामही करत असतात. मात्र अनेकदा नागरिक यांच्याकडे दुर्लक्ष करतात व फसले जातात. सायबर गुन्ह्याची एका दिवसात दुसरी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये २३ वर्षाच्या तरुणीला ओटीपी मागत तिच्या खात्यातून एक लाख ८१ हजार लंपास केल्याचे समोर आले आहे. याबाबत कोंढव्यातील एनआयबीएमपरिसरात राहणाऱ्या २३वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलिसांकडे याबाबत तक्रार नोंदवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणीने ३ महिन्यांपूर्वी ऑनलाईन शॉपिंग साईट वरून बूट ऑर्डर केले होते. मात्र या ऑर्डरचा कन्फर्मेशन कोड न आल्याने तरुणीने गूगलवरून संकेतस्थळाचा कस्टमर केअर नंबर मिळवला. पण झाले असे की हा नंबर सायबर चोरट्यांनी गूगलवर टाकलेला बनावट नंबर होता. तरुणीनं फोन करताच सायबर चोरट्यांनी तिचे सर्व म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर तिला फोनवर आलेला ओटीपी शेअर करण्यास सांगितले. त्याप्रमाणे पीडित तरुणीने ओटीपी शेअर केला. पुढे याच ओटीपीच्या आधारे सायबर चोरट्यांनी विविध व्यवहार करत तिच्या खात्यातील तब्बल १ लाख ८१ हजार ६१ रुपयांवर डल्ला मारला आहे. मात्र खात्यातून खात्यातून पैसे गायब होताच पीडित तरुणीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here