दाराच्या फटीतून वहिनी व भावाच्या बेडरूममध्ये पाहतो म्हणून धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : कल्याण पश्चिम भागातील उंबर्डे गावात शनिवारी (दि. २०) पहाटेच्या सुमारास सार्वजनिक शौचालयात प्रातःविधीसाठी गेलेल्या अभिमान भंडारी (वय ५१ वर्षे) या रिक्षाचालकाचा अज्ञात व्यक्तींकडून धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती.

या प्रकरणाच्या पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आली असून मृत रिक्षाचालक शेजारी राहणाऱ्या एका घरातील दाराच्या फटीतून वहिनी व भावाच्या बेडरूममध्ये पाहत असल्याने रिक्षाचालकाची दिरानेच निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. सोपान पंजे (वय २३ वर्षे), असे अटक आरोपीचे नाव आहे.

कल्याण पश्चिमेतील उंबर्डे गावात रिक्षाचालक अभिमान भंडारी हे कुटुंबीयासह राहत होते. त्यातच शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे घराबाहेर असलेल्या गावातील सार्वजनिक शौचालयात गेले होते. त्यावेळी दबाधरून बसलेल्या आरोपीने धारदार शस्त्राने वार करून त्यांची निर्घृण हत्या करून तेथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अभिमान यांना रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. तर खडकपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता.

आरोपी सोपान हा वहिनी व दादा सोबत राहतो. तर मृत अभिनव हा त्याच्या शेजारी राहत होता. मृताला शेजाऱ्या घरातील बेडरूमकडील खिडकीच्या फटीतून पती-पत्नीचे संबध पाहण्याची विकृत सवय होती. त्यातच काही दिवसांपासून आरोपी सोपानला या विकृतीची खबर लागली. त्यानंतर त्याने यापूर्वीही मृत अभिमानला दोन ते तीन वेळा समज देऊन दाराच्या फटीतून बघू नकोस म्हणून सांगितले होते. तरीही मृत रात्री-अपरात्री दाराच्या फटीतून बेडरूमध्ये पाहतच होता. याच विकृतीने त्याचा घात केला. पोलिसांनी आरोपीच्या शोधात ४ ते ५ पथके तयार केली होती. या पोलीस पथकांना आरोपीला २४ तासातच अटक करून हत्येचा उलगडा करण्यात यश आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here