गेस्टहाऊसच्या सुरक्षा रक्षकानं बाथरूममध्ये आंघोळ करणार्‍या ३६ वर्षीय महिलेचं केलं व्हिडीओ शुटिंग

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : येथील आयबी गेस्ट हाऊसचा सुरक्षारक्षक अशोक तुकाराम चव्हाण (वय २६, रा. आय बी गेस्ट हाऊस) याला गेस्टहाऊसमधील आंघोळ करणार्‍या महिलेचा बाथरुममधील खिडकीतून फोटो, व्हिडीओ काढण्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी एका ३६ वर्षाच्या महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला या आय बी गेस्ट हाऊसमधील आपल्या खोलीत दुपारी आंघोळ करीत होत्या. यावेळी सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा अशोक चव्हाण हा बाथरुमच्या खिडकीजवळ आला.

खिडकीचे बाहेर उभा राहून त्याने आंघोळ करणार्‍या या महिलेचे आपल्या मोबाईलवर फोटो व व्हिडिओ काढले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केल्यावर इतरांनी अशोक चव्हाण याला पकडले व पोलिसांच्या हवाली केले. सहायक पोलीस निरीक्षक सपकाळे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here