जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : शहरातील विविध ठिकाणी मोबाईल हिसकवणारे दोघे चोरट्यांना आज जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्थानकात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २१ रोजी वेळ सांयकाळच्या सुमारास फिर्यादी हितेश प्रशांत बऱ्हाटे (रा. मुक्ताईनगर जळगाव) हे त्याच्या आईचे मोबाईल टफन ग्लास लावण्यास गणेश कॉलनी येथे जात असतांना दोन अज्ञात चोरट्यांनी ओप्पो कंपनीचा १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकवुन मोटर सायकलवर पळुन गेले होते. तसेच अनुप पवार (रा. गणेश कॉलनी) यांचा रिंगरोड जळगाव येथुन दोघांनी त्यांचा मोबाईल हिसकवुन पळुन गेल्याची घटना घडली. जिल्हापेठ पोलिस स्थानकात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, डी. वाए.एसपी चंद्रकांत गवळी, पोलिस उपाध्यक्ष कुमार चिंता, यांच्या मार्गदर्शनखाली पो.नि रामदास वाकोडे, एपीआय महेंद्र वाघमारे, पिएसआय प्रदीप चंदेल कर, हे.कॉ महेंद्र पाटील, हे.कॉ फिरोज तड़वी, पोना गणेश पाटील, पो.कॉ योगेश साबळे, पो. कॉ समाधान पाटील, पो.कॉ अमित मराठे, पो.कॉ विकास पहुरकर यांनी तांत्रिक व गोपनीय खात्रीशीर महितीवरुन आरोपी आकाश संजय पाटिल, (वय १८ रा. वरणगाव जीजाऊ नगर ह मु कलेक्टर ऑफिस मागे जळगाव गणेश राजेंद्र शिंदे, ( वय १८ रा. वाघनगर जळगाव असे दोघांनाही ताब्यात घेतले.
चोरट्यांकडून पहिल्या फिर्यादीच्या मोबाईल हस्तगत करण्यात आला असुन नमुद दोन्ही आरोपींना मुगळीकर यांच्या समोर हजर करण्यात आले. त्यावेळी दि. २५ पर्यंत पीसीआर रिमांड मिळाला असुन पिसीआर या कालावधी नमुद आरोपींनी गुन्हाची कबुली दिल्यावरुन गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व इतर दोन हिसकवुन नेलेले मोबाईल पंचनाम्यप्रमाणे पोलिसांनी जप्त करण्यात आले.






