ठाणे येथील श्री साईनाथ सेवा समिती आयोजित ३५ वा वर्धापन दिन उत्सव सोहळा

ठाणे (प्रतिनिधी सुभाष जैन) : सर्व साई भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि कार्तिक कृष्ण अष्टमी ll शनिवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२१ ते कार्तिक कृष्ण दशमी ll सोमवार दि.२९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत साईनाथ मंदिराचा ३५ वा वर्धापन दिन उत्सव साजरा करण्यात येत आहे. हा सोहळा संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक,ठा.म.पा. बळीराम वा.नईबागकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.

 

तसेच या दरम्यान शनिवार दि. २७ रोजी सकाळी ७.३० पासुन प्रसाद वाटप सुरू होईल. सोमवार दि. २९ रोजी दुपारी ३ वाजता साईबाबांच्या पादुकांची पालखी मिरवणूक मंदिर आवारातच निघेल.याची साई भक्तांनी नोंद घ्यावी.गर्दी करु नये. यावेळी इतर कार्यक्रम गायन भजन व कीर्तन होईल.

 

श्री गणेश-शिवपार्वती-दुर्गामाता,श्री नागदेवता,श्री महापुरुष,श्री दत्त पादुका व शनीदेव, श्री मारुती या मंदिराचा ही वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. राज्य शासनाने जारी केलेल्या कोरोना संदर्भात अटीशर्तींचे पालन करून साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने वै. वा.प.पु.योगानंदाचार्य स्वामी रत्नाकर महाराज मु.पो.इंदगाव बदलापुर यांच्या आशीर्वादाने शनिवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२१ ते सोमवार दि.२९ नोव्हेंबर २०२१ रोजी जनकल्याणार्थ श्री गणेश याग यज्ञ आयोजित केला आहे, तरी सर्व आपण सहपरिवार मित्रमंडळीसह दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख सल्लागार-मा.आमदार संजय मुकुंद केळकर, संस्थापक अध्यक्ष-माजी नगर सेवक बळीराम वासुदेव नईबागकर, कार्याध्यक्ष मंगेश ब.नईबागकर, सचिव सुरेश शंकर महाडिक, खजिनदार.बबन शंकर बोबडे, सहसचिव विकास ना.झगडे, उपाध्यक्ष अशोक धों.सुर्वे, उपाध्यक्ष अशोक रा. हिरानंदानी, विश्वस्थ हरि शंकर माळी, विश्वस्थ नंदकुमार बा. साळवी, विश्वस्थ प्रविण पं.रोठे, विश्वस्थ गौतम दा.हिरे, विश्वस्त अपर्णा जाधव यांनी केले आहे.

सरकारचा आदेश मिळाल्यानंतरच दि.२९ रोजी मंदिर अहोरात्र खुले राहील.याची साईभक्तांनी नोंद घ्यावी. ज्या भक्तांना प्रसादासाठी देणगी स्वरूपात द्यायची असेल त्यांनी साई मंदिर कार्यालयाशी संपर्क साधावा .अथवा ऑनलाइन पद्धतीने देणगी द्यावी, कृपया मंदिराच्या बाहेर कोणीही देणगी अथवा वस्तू देऊ नये. अधिक माहितीसाठी कार्यालय संपर्क: 9967289239/8779239831/9082287944, रोठे:9028955255/महाडिक:9821526209, झगडे:9820831631 संपर्क साधावा, अशी माहिती कार्याध्यक्ष मंगेश ब.नईबागकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here