जळगाव (क्राइम रिपोर्टर असलम खान) : शाहूनगर परिसरात मध्यरात्रि घरातुन ४ मोबाईल लांबविणाऱ्या चोरट्यांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महिती अशी की विशाल विनायक काटकर (वय ३३) रा. शाहूनगर ट्राफिक गार्डन हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यला आहे. ते एका खासगी बैंकत नोकरीला आहे. सोमवारी १२ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजता सर्वजन जेवण करुन झोपले होते. त्यावेळी पावसाचे पाणी आल्याने त्याचा घराचा दरवाजा लागत नसल्याने त्यांनी दरवाजा लोटुन झोपले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरातील सदस्यांचे ५९ हजार रुपये किंमतीचे २ मोबाईल चोरुन नेले. त्यांच्या घराजवळ राहणारे सतीश गजानन साळुखे ( वय३९) यांच्ये देखील २ मोबाईल असे एकुण ५९ हजाराचे ४ मोबाईल चोरीला गेल्याचे मंगळवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आले. घरातुन एकुण ४ मोबाईल लांबविणाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
विशाल विनायक यांनी बुधवारी २३ नोव्हेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात धाव घेवुन मोबाइल चोरीची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन सकाळी ९ वाजता शहर पोलिस ठाण्यात गुना दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक विजय ठाकुरवाड यांना घरफोडी आरोपी सुरत येथे जाण्याच्या तयारीत असल्याची गोपनिय महिती मिळाली त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे पोहेकॉ विजय निकुंभ, पोहेकॉ खवले प्रफुल्ल धांडे, पो.ना भास्कर ठाकरे, योगेश पाटिल, पो कॉ रतन गीते, पोकॉ तेजस मराठे, योगेश इंधाडे, पोकॉ प्रणेश ठाकुर, यांनी अवघ्यात एक तासात संशियत आरोपी शोएब उर्फ इक्का, शरीफ भिस्ती (वय२०), सागर राजू उगले, (वय-२५) आणि जुबेर उर्फ डेविड, जाविद भिस्ती (वय-२२) तिघे रा. शाहू नगर यांना बुधवार २४ नोव्हेंबर रोजी ११ वाजता शाहूनगरातुन अटक केली आहे. तिघांकडुन चोरिचे ४ ही मोबाईल हस्तगत करण्यात आला असुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी तिघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.






