कळवण शहरातील मुख्य रस्त्याच्या कामाला होत असलेल्या विलंबाबद्दल मुख्य कार्यकारी अभियंता नाशिक यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक

नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि कुबेर जाधव) : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना डॉ भारतीताई पवार यांच्या सूचनेनुसार सा, बां, विभाग मुख्य कार्यकारी अभियंता नाशिक यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.

बैठकीत कळवण शहरातील मुख्य रस्त्याच्या कामाला होत असलेल्या विलंबाबद्दल चर्चा झाली यात मुख्य कार्यकारी अभियंता साहेबांनी संबधित काम करणाऱ्या ठेकेदाराचा चांगलाच समाचार घेतला व एका बाजूचे अर्धवट काम शनिवार पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले.

उपमुख्यमंत्र्यांचा कळवण दौरा आटोपल्यानंतर दुसऱ्या बाजूचेही काम लवकर सुरू करून पूर्ण करण्यात यावे अशी सूचना दिली व सदर रस्ता हा राज्य सरकारच्या अखत्यारीत येतो, अशी माहिती दिली तरीही मा,ना भारतीताई पवार यांच्या मतदार संघातील जनतेला होत असलेल्या त्रासामुळे मा,ना,ताईंनी या विषया चे गांभीर्य लक्षात घेऊन तशा सूचना दिल्या त्याप्रमाणे तात्काळ बैठक घेण्यास सांगितले, कळवण ते नाशिक रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम उद्यापासून सुरू होणार आहे अशी माहिती ठेकेदाराकडून देण्यात आली.

यावेळी सा. बां. विभागाचे श्री.भोसले, मुख्य अभियंता सा. बां. प्रादेशिक विभाग नाशिक श्री.सोनवणे, अधीक्षक अभियंता सा.बां. मंडळ नाशिक श्री वसावे, कार्यकारी अभियंता आदिवासी सा. बां. विभाग कळवण, ठेकेदारांच्या वतीने श्री.देशमुख, कळवण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोहनशेठ संचेती, चंदूनाना कोठावदे, बालूशेठ देवघरे, कुमारजी रायते, दिपकजी महाजन, प्रवीण रौदळ, रुपेश शिरोडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here