बंद कारखान्यातील पावणे तीन लाखाच्या मुद्देमालावर चोरट्यांचा डल्ला

thief

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : बंद कारखान्याच्या आवारातील सुमारे पावणे तीन लाख रूपये किमतीच्या मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला असून, ही घटना शिंदे ता.जि.नाशिक शिवारात घडली.

चोरीस गेलेल्या ऐवजात संगणक,मशिन वॉल,आर्मड केबल,केमिकल टेस्टींग साहित्याचा समावेश आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेघराज भाऊराव पवार (रा.खांडे मळा,सावतानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे.

पवार, शिंदे गावातील सोहम आॅर्गेनिक्स प्रा.लि. या कंपनीचे काम बघतात. दि.३१ आॅक्टोबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान कंपनीचे कामकाज बंद असतांना ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी बंद कंपनीच्या कंपाऊंड भिंतीवरून प्रवेश करीत आवारातील व कार्यालयातील संगणक मशिन वॉल,आर्मड केबल असा सुमारे २ लाख ८३ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार उजागरे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here