दि. २९ नोव्हेंबर राशिभविष्य : उत्तरा फाल्गुनी नक्षत्र देईल या राशींना शुभफलप्राप्ती

rashi-bhavishya

मेष – आज ग्रहांची स्थिती काहीशी विचित्र असल्याने तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी स्पष्टपणे बोलण्याऐवजी लपविण्याचा प्रयत्न कराल. परंतु या गोष्टीचा तुम्हाला फायदा होईल. आज चंद्र तुमच्या कुंडलीतील सहाव्या स्थानी विराजमान आहे. तोंडावर कौतुक करणाऱ्या आणि मागून तुमची निंदा करणाऱ्या व्यक्तींपासून आज सावध राहा.

 

वृषभ – आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन अनुभव येतील. सहकारी वर्गासोबत तुमचे संबंध सुधारतील. या राशीतील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. स्कूल किंवा कॉलेजमध्ये प्रगती कराल. एखाद्या ज्ञानी व्यक्तीसोबत आज तुमची भेट घडून येईल. संध्याकाळी मित्रांसोबत मजेत वेळ घालवाल.

मिथुन – घरातील सदस्यांसोबत बिघडलेले संबंध सुधारण्याचा आज तुम्ही प्रयत्न कराल आणि त्यात यशस्वीही व्हाल. जर आईचे स्वास्थ्य बिघडले असेल आज त्यात सुधारणा होऊ शकते. त्यामुळे तुमची चिंता दूर होईल. या राशीतील काही व्यक्ती आज आपल्या जुन्या मित्रांना भेटू शकतात.

कर्क – तुमच्या वाणीच्या तेजामुळे आज तुम्हाला सामाजिक स्तरावर मानसन्मान मिळेल. आपल्या बोलण्याने तुम्ही आपल्या जवळच्या व्यक्तींचे मन जिंकू शकता. जर तुम्ही बराच काळ घराबाहेर असाल तर आज घरातील सदस्यांसोबत बोलल्यास तुम्हाला बरं वाटेल. आज या राशीतील काही व्यक्तींना कामाच्या निमित्ताने जवळपासचा प्रवास करावा लागू शकतो.

 

सिंह – आज तुमच्या कुंडलीतील द्वितीय स्थानी चंद्र असल्याने तुम्ही आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत संपर्क साधू शकता. आजोळच्या माणसांसोबत आज भेट घडून येईल. वडिलोपार्जित संपत्तीमधून आज तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

कन्या – आज तुम्ही सामाजिक स्तरावर किंवा कामाच्या ठिकाणी आपल्या अनुभवांचा योग्य वापर कराल. आज तुम्हाला मानसिक शांतीचा अनुभव घेता येईल. कारण आज चंद्र तुमच्या कुंडलीतील प्रथम स्थानी आहे. आज अध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना आपल्या क्षेत्रात प्रगती साधता येईल त्यामुळे त्यांच्यासाठी आजचा दिवस सुखद ठरेल.

 

तूळ – घरातील खर्चाशी संबंधित समस्यांमध्ये आज वाढ होऊ शकते. त्यामुळे आपला बजेट योग्यप्रकारे प्लॅन करा. आज तुमच्या कुंडलीतील द्वादश स्थानी चंद्र विराजित असल्याने परदेशी स्त्रोतातून तूळ राशीतील व्यक्तींना लाभ मिळू शकतो. जर तुम्ही परदेशी कंपनीत काम करत असाल तर तुम्हाला लाभ प्राप्ती होऊ शकते.

वृश्चिक – वृश्चिक राशीतील व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस लाभदायक ठरेल. एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. आज चंद्र तुमच्या कुंडलीतील एकादश स्थानी विराजमान असल्याने तुमच्या मोठ्या बहीण किंवा भावाकडून तुम्हाला लाभ मिळेल. जर तुम्ही प्रवासाला जाणार असाल तर आपल्या सामानाची विशेष काळजी घ्या.

धनू -आज धनू राशीतील व्यक्तींना आपल्या करियरमध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही जॉबसाठी एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यू दिला असेल तर आज तुम्हाला सकारात्मक उत्तर प्राप्त होऊ शकते. या राशीतील व्यक्तींचे वडिलांसोबतचे संबंध सुधारतील. अनावश्यक चिंता दूर होतील त्यामुळे सामाजिक स्तरावर आज तुम्हाला चांगले अनुभव येतील.

 

मकर – आज तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम बनाल. तुमच्या कुंडलीतील नवव्या स्थानी विराजमान असलेला चंद्र धार्मिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात तुमची रुची वाढवेल. या राशीतील ज्या व्यक्ती उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना आज लाभ मिळू शकतो. कामाच्या संबंधाने आज काही व्यक्तींना परदेशी जाण्याची संधी मिळू शकते.

कुंभ – आज कुंभ राशीतील व्यक्तींनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आज चंद्र तुमच्या कुंडलीतील आठव्या स्थानी विराजमान असल्याने एखादे जुने दुखणे पुन्हा त्रास देण्याची शक्यता आहे. या राशीतील ज्या व्यक्ती गूढ विषयांचे अध्ययन करत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस अनुकूल ठरू शकतो.

मीन – आज मीन राशीतील व्यक्तींना वैवाहिक आयुष्यात सुखद अनुभव येतील. आज चंद्र तुमच्या कुंडलीतील सातव्या स्थानी असल्याने जोडीदारासोबत निर्माण झालेले मतभेद मिटवण्यासही कारणीभूत ठरेल. या राशीतील काही व्यक्तींना आज भागीदारीत केलेल्या व्यवसायातून लाभ मिळेल. सामजिक स्तरावर आज तुमच्या मानसन्मानात वाढ होईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here