सराईत दुचाकी चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून जेरबंद

अहमदनगर (प्रतिनिधी) : कोपरगाव शहरातून दुचाकी चोरणाऱ्या महेश भाऊसाहेब मंचरे (वय २५, गोटुंबे आखाडा (ता.राहुरी) या सराईत चोराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मच्छिंद्र परसराम पोकळे (रा. ओमनगर, कोपरगाव) यांची दुचाकी घरासमोरून चोरीला गेली होती. पोकळे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सदर दुचाकी मंचरे याने चोरली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने आरोपी मंचरे याला अटक केली.

त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. आरोपी मंचरे विरोधात कोपरगाव शहर, संगमनेर, कर्जत, राहाता, लोणी, जालना तालुका (जि. जालना) पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे नऊ गुन्हे दाखल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here