पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : शहरामध्ये महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. यामध्ये लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण जास्त आहे. अशा गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अशीच एक घटना पिंपरी चिंचवड येथे घडली आहे. चॉकलेटचे आमिष दाखवत ४ वर्षाच्या मुलीवर १२ वर्षाच्या मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
हा प्रकार चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळे वस्ती येथे १५ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने शनिवारी (दि.२७) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीवरुन १२ वर्षाच्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेवाळे वस्ती येथे आई-वडिल आणि पीडित वर्षाची चार वर्षाची मुलगी असे कुटुंब राहते. ही मुलगी शेजारी राहणाऱ्या कुटुंबाच्या घरी खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी १२ वर्षाच्या मुलाने पीडित मुलीला चॉकलेट आणण्यासाठी पैसे देतो.असे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद करीत आहेत.






