नाशकात लग्नाचे आमीष दाखवून दिव्यांग मुलीवर अत्याचार

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : लग्नाचे आमीष दाखवून दिव्यांग मुलीवर एकाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात शुभम सुनील चांडोले (रा. तलाठी कॉलनी, दिंडोरीरोड) याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेच्या फिर्यादीनुसार संशयित शुभम चांडोले याने फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान कापडबाजार येथील घरात दोन वेळा अत्याचार केला. संशयित शुभम याने स्वत: विवाहित असल्याची बाब लपवून पीडितेस लग्नाचे आमीष दाखवून प्रेमसंबंध ठेवून अत्याचार केला. त्यातून पीडिता सात महिन्यांची गर्भवती झाली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here