नाशिक (विशेष प्रतिनिधी) : कौटुंबिक कारणातून मारहाण करणाऱ्या चौघांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाेलिसास चौघांनी मारहाण करीत दुखापत केल्याची घटना काझीपुरा परिसरात घडली.
याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित संजय दामोदर कमोद (५०), अनिल दामोदर कमोद (५५), अक्षद अनिल कमोद (२५) व सिद्धार्थ संजय कमोद (२३, सर्व रा. काझीपुरा) यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अंमलदार मुजाहिद मेहमूद सय्यद (२९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चौघे संशयित त्यांच्या नातलग लता सुनील कमोद (रा. काझीपुरा) यांच्या घरी गेले व लता यांच्या मुलाकडे रहिवासी पुराव्याचे कागदपत्र मागून मारहाण केली. मुजाहिद यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता चौघांनी मिळून त्यांना मारहाण करीत त्यांच्या हाताचे बोट फ्रॅक्चर केले. याप्रकरणी भद्रकाली पोलिस तपास करीत आहेत.







