नाशिक (विशेष प्रतिनिधी) : गंगापूर शिवारात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळून आला. तेजस बळवंत देसाई (२२, रा. अशोकनगर, सातपूर) याने गंगापूर पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गंगापूर शिवारातील अवधूत डोंगरावरील एका झाडाला शनिवारी (दि.२७) सायंकाळच्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील युवकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.






