जळगाव (क्राइम रिपोर्टर असलम खान) : महिला व दलितांच्या सर्वांगीण विकासासाठी जिवन समर्पित करणारे , छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधणारे , देशाला सत्यशोधक विचारांचा वारसा देणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतीथी निमित्ताने फुले मार्केट येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला व फुले नगर येथील महात्मा फुले यांच्या प्रतिमेला महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
याप्रसंगी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे , छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , संविधान जागर समितीचे हरिश्चंद्र सोनवणे सर , कास्ट्राईब संघटनेचे रमेश सोनवणे , विर सावरकर रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीप सपकाळे , वाल्मिक सपकाळे , महेंद्र केदारे , राजू सोनवणे , उद्योजक संतोष इंगळे , महात्मा फुले समता परिषदेच्या निवेदिता ताठे , सुभाष माळी , नंदू पाटिल , वामन महाजन महानगरपालिकेचे चंद्रकांत वांद्रे , गोपी सपकाळे शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ पाटील, कार्याध्यक्ष अजय पाटील, पंकज गरुड, किशोर पाटील, पद्माकर चौधरी,अजित चौधरी, मानव भालेराव आदि उपस्थित होते .






